जळकोट,दि.१० :  मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवासी व अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अंकुश कदम यांची राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागास प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीवर प्रा. डॉ. अंकुश कदम यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. 


राज्यातील निवडक तज्ञ मंडळी या समितीवर काम करणार आहेत. या निवडीचे शिक्षण प्रसारक मंडळ ,अणदूर, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक मंडळी, कर्मचारी व जळकोट ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
 
Top