तुळजापूर , दि. १० 


शारदीय नवरात्र महोत्सवातील ललिता पंचमी च्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या मुख्य सिंहासनावर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आलेली होती, हजारो भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भवानी मातेचे दर्शन घेतले.


कोरोना नियमांचे पालन करीत शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे यामध्ये ललिता पंचमी या दिवशी तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजा सकाळी संपन्न झाली तत्पूर्वी पहाटे चरणतीर्थ महापूजा करण्यात आली त्यानंतर भवानीमातेचा दही आणि दुधाचे अभिषेक घालण्यात आले सकाळी दहा वाजता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवीसमोर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली यामध्ये तुळजाभवानी देवी बासरी वादन करत आहे, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये भाविकांना दर्शन देत आहे असा हा देखावा मांडलेला होता.


आधीचा मुख्य सिंहासन यानिमित्ताने नेत्रदीपक फुलांनी सजविण्यात आले होते देवीचे केस मोकळे सोडून हातांमध्ये बासरी घेऊन ती बासरी वादन करत आहे असा हा मनमोहक देवगड देखावा दिवसभर भाविकांनी अनुभवला. कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि कोरोना नियमांचे निर्देश राज्य शासनाने जारी केलेले असल्यामुळे केवळ पंधरा हजार भाविकांना दररोज दर्शन दिले जात आहे या साठी भाविकांना लसीकरण केलेले प्रमाणपत्र सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार प्रमाणपत्र आणि आधार कार्ड ाचे अवलोकन पोलीस कर्मचार्‍यांच्या वतीने महाद्वारावर करण्यात येत आहे.
 
Top