नळदुर्ग , दि . १० : विलास येडगे
नळदुर्ग नगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले आहे.
शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नळदुर्ग येथे आगामी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ध्येर्यशील पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अदित्य गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलेचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण, राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दुर्गेश साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. जुबेर शेख, अल्पसंख्याक सेलचे तुळजापूर तालुका अध्यक्ष फेरोज पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसच जिल्हा सचिव नितीन बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नळदुर्गचे निरीक्षक मसुद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शफी शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुश्ताक कुरेशी, अल्पसंख्याक सेलेच जिल्हा कार्याध्यक्ष तौफीक शेख, मलंग शेख आदी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना जीवनराव गोरे म्हणाले की, नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे, त्यामुळे येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा नळदुर्ग नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करावा. भाजपाने आसुरी शक्तीच्या बळावर देशात गोंधळ माजविण्या बरोबरच सामान्य लोकांना चिरडण्याचे काम केले आहे. ग्रामीण भाग व शेतकरी समाज उध्वस्त् करण्याचे काम भाजपा करत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आमानुषपणे छळण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी बोलताना म्हटले की, भाजप सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, हे जुलमी सरकार असून शेतकऱ्यांच्या हिताचा एक ही निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. या जुलमी राजवटीच्या विरोधात महाराष्ट्र एकसंघ उभा आहे हे दाखविण्यासाठी उदयाचा बंद यशस्वी करुन दाखवावा असे ही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी शहरातील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यामध्ये शिवशाही तरुण मंडळाचे कोषाध्यक्ष संतोष मुळे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर इंदिरा नगर येथील कार्यकर्ते आनंद पवार यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष उमेश जाधव यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दत्ता कणीराम राठोड यांची शहर सचिव, गौस कुरेशी शहर सचिव पदी निवड करण्यात आली तर यांच्यासह अनेकांनी नियुक्ती पत्र जीवनराव गोरे व सुरेश बिराजदार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेबुब शेख, बशीर शेख, ताजोददीन शेख, आनंद पुदाले, अजिज जुनौदी यांच्यासह अनेकानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक नगरसेवक मुश्ताक करेशी यांनी केले तर आभार बशीर शेख यांनी मानले.