जळकोट , दि .११ 


उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाविकास आघाडीने सोमवारी 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याअनुषंगाने जळकोट ता. तुळजापूर  येथे  बंदला उत्सर्फुत प्रतिसाद लाभला.


काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ,,व घटक पक्षांच्या वतीने  कालच व्यापार्याना जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश कदम, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, ग्रा.प.सदस्य गजेंद्र कदम,यशवंत पाटील, बसवराज कवठे,राजु पाटील ,बबन मोरे,शंकर वाडीकर, सुधाकर कदम,किरण कदम,अनिल छत्रे,अप्पु किलजे , विजय यादगौडा,भैय्या किलजे,यांनी,आवाहन केले होते .व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.यावेळी जळकोट येथे शंभर टक्के बंद करण्यात आले.
 
Top