अणदूर , दि . ११:
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ,वैशाली घुगे याना सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन तर्फे दिला जाणारा" डॉ कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे, त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
युवकांचे प्रेरणास्थान ,महासत्ता भारताचे स्वप्न देशवासियांना देणारे महान शास्त्रज्ञ ,
केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगालाच वंदनीय ठरावेत असे व्यक्तिमत्त्व भारतरत्न,माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ,ए,पी,जे अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर जयंती निमित्त ड्रीम फौंडेशन तर्फे सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,युवा जागर,शेती,प्रशासन,ग्रामीण विकास या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा "डॉ,कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार 2021" हा सौ वैशाली घुगे यांना मिळाला आहे,
शुक्रवार दि,15 ऑक्टोबर 2021 रोजी अंजनी मल्टिपर्पज हॉल , वीरशैव नगर इंचगेरी मठ जवळ जुळे सोलापूर येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.