नळदुर्ग , दि. ११ : विलास येडगे 

उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ दि.११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने पुकारलेल्या नळदुर्ग बंदला उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला. 


यावेळी शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरांतील चावडी चौक ते बसस्थानकापर्यंत मोर्चा काढुन भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
     

उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे आंदोलांकर्त्या शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडुन ठार मारणाऱ्या निंदनीय घटनेचा निषेध म्हणुन दि.११ ऑक्टोबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या  वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. नळदुर्ग शहरातही महाविकास आघाडीच्या वतीने नळदुर्ग बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरांतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरांतील चावडी चौक ते बसस्थानक असा मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेबुब शेख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी,नगरसेवक शहेबाज काझी, बसवराज धरणे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शफीभाई शेख,बशीर शेख, महिला काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षा सुभद्रा मुळे, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड,माजी नगरसेवक इमाम शेख सचिन डुकरे, काँग्रेसचे नाना काझी, अजहर जहागिरदार,सुभाष कोरे, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,शिवसेनेचे नेताजी महाबोले, सोमनाथ म्हेत्रे, शाम कनकधर,खय्युम कुरेशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे ताजोद्दीन शेख, गौस कुरेशी आदीजन सहभागी झाले होते. यावेळी भाजपाच्या विरोधात मोठ्याप्रमाणात घोषणा देण्यात आल्या. मोर्चा बसस्थानकासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.


 यावेळी कमलाकर चव्हाण, सरदारसिंग ठाकुर, नवाज काझी,शहेबाज काझी, संतोष पुदाले,शफीभाई शेख, सचिन डुकरे,इमाम शेख, सुभद्रा मुळे व कल्पना गायकवाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करून हे सरकार हुकुमशहा सारखे वागत असुन शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर उतरले असल्याचे सांगितले. यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नळदुर्गचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांना निवेदन दिले.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, पोलिस उपनिरीक्षक एम. एम.शहा, जीविशाचे धनंजय वाघमारे, अच्युत पोतदार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
 
Top