तुळजापूर , दि . ११
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने अन्न व औषध प्रशासन आणि उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवामुळे देवीदर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हे मास्क वाटप करण्यात आले.
येथील जुन्या बसस्थानकामध्ये भाविकांसह बसस्थानकावरील एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड्स यांनाही मोफत मास्क वितरीत करण्यात आले. हा उपक्रम अन्न व औषधी प्रशासन आणि उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला.
यावेळी औषधी निरिक्षक श्री.नामदेव भालेराव, केमिस्ट असोसिशन तुळजापूर येथील सदस्य किरण हंगरगेकर, संतोष लोखंडे, लक्ष्मण निकम, प्रशांत संकपाळ, विश्वजीत पवार, महेश वट्टे, सत्यजित कुतवळ, आकाश मिसाळ, रोहित नाईकवाडी, मनोज शिलवंत, इंदोरीकर, मोहित सिंदफळकर, समर्थ मेत्रे यांच्यासह केमिस्ट बांधव उपस्थित होते.