तुळजापूर - मसला खु.  दि .११

राष्ट्रीय टपाल सप्ताह दिना निमित्त मसला खुर्द ता.तुळजापूर येथील टपाल कार्यालय नविन ईमारत स्थलांतरीत झाले असून सदरील नविन ईमारतीचे उद्घाटन दि.११ रोजी गावचे उपसरपंच आबासाहेब पाटील व काटी पोस्ट सब कर्यालयाचे सबपोस्टमास्तर श्रीकांत पाठक यांचे शुभास्ते करण्यात आले.
              

 यावेळी पोलीस पाटील गणेश कुंभार,सुदर्शन काळदाते,लक्ष्मण वडवराव,ग्रामरोगार सेवक सुग्रीव जाधव,अंगणवाडी कार्यकर्त्या,आशा वर्कर्स उपस्थित होते.यानिमित्ताने श्रीकांत पाठक यानीं पोस्ट कार्यालय अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन उपस्थिताना मार्गदर्शन केले.शेवटी कार्यक्रामातील उपस्थीतांचे पोस्टमास्तर रणधीर पाटील यानीं आभार व्यक्त केले.
 
Top