काटी , दि . २६ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हॉटेल व्यावसायिक हेरार मतीन काझी यांची भाच्ची कर्जत ता.अहमदनगर येथील निवासी शबनम शेख हिची भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने
जागतीक कुस्ती संघटनेच्या वतीने बेलग्रेड, सर्बिया (युरोप) येथे दि. 1 ते 7 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय सीनियर कुस्ती संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा प्रा.शबनम शेख आंतरराष्ट्रीय कोच हे प्रथम श्रेणीचे (NIS)असून आज पर्यत त्यांनी आशियाई, जागतीक स्पर्धा अशा 15 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाची कोच म्हणून काम पाहीले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार, आ.संग्राम जगताप,आ.अरुण जगताप, आ.बबन पाचपुते, आ.शिवाजीराव कर्डिले ,मा.मंत्री अर्जुन खोतकर, आ.भीमराव धोंडे , मा. खा.चंद्रकांत खैरे यांच्यासह शबनम शेख यांच्या आजोळी काटी (ता. तुळजापूर) येथे अभिनंदन केले जात आहे..