उमरगा , दि . २५ : 

'यूपीएससी'मध्ये यश संपादन केलेल्या उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश गायकवाड यांचा रविवार  रोजी मुख्यमंत्री ना . उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील 'वर्षा'निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मा आदित्य ठाकरे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदय सामंत,परिवहन मंत्री  अनिल परब, रश्मी ठाकरे, आयोजक  विजय कदम यांची उपस्थिती होती.


काही दिवसापूर्वी यूपीएससीचा निकाल लागला आहे.महाराष्ट्रातील गुणवंतांनी घवघवीत यश संपादन आपली करून गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या सर्व गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला सोहळा विद्यार्थ्यांसाठी गौरवास्पद बाब आहे.प्रशासकीय सेवेत पुढील वाटचाल करताना मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवराकडून मिळालेल्या शुभेच्छा व कलेले कौतुक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यशस्वीतांनी व्यक्त केला.
 
Top