जळकोट, दि.२४ :मेघराज किलजे
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतात. एखाद्या पर्यटन स्थळी जाणे त्यांना अशक्य असते. दूरवरचा प्रवास तर लांबच. अशा समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या २५ महिलांना बेंगलोर ते तिरुपती व तिरुपती ते गुलबर्गा अशी विमानात हवाई सफर ' घडवून . दूरवरचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
जळकोट ता. तुळजापूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम यांनी स्वखर्चातून हि' हवाई सफर घडवून आणली आहे .
गजेंद्र हरिदास कदम यांनी इतर आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे लोक स्वतः व कुटुंबाला पर्यटन स्थळी घेऊन जाऊ शकतात. परंतु समाजातील आर्थिक समस्यांमुळे अनेक महिलांना इच्छा असूनही पर्यटन स्थळी जाता येत नाही. अशा निराधार व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांनाही दूरवरचे पर्यटन स्थळ पाहता यावे. यासाठी मी व माझे कुटुंब यांनी त्यांच्या समवेत पर्यटन करण्याचा निश्चय केला. या निश्चयाप्रमाणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर असलेला विमान प्रवास आपण घडवावा. अशी मनापासून इच्छा व्यक्त झाली.
जळकोट गावातील २५ महिलांना विमानातून प्रवास करण्याचा योग आला. हे मी माझे भाग्य समजतो. या महिलांना बेंगलोर ते तिरुपती व तिरुपती ते गुलबर्गा असा विमानप्रवास करून तिरुपतीचे दर्शन घडवले आहे. एक दिवस बेंगलोर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन महिलांना बेंगलोर शहर दाखवले आहे.
या विमानाच्या' हवाई सफर ' मध्ये हिरकणाबाई लिंबाजी चंदे, लक्ष्मीबाई श्रीमंत कुंभार, शांताबाई शिवलिंगप्पा कुंभार, शेषाबाई गणपती हासुरे, रूक्मीनबाई कुंडलिक जाधव, कस्तुराबाई धानाप्पा कुंभार, यमुनाबाई मारुती अंगुले, उषा प्रल्हाद सुतार, फुलाबाई बाबुराव मडोळे, वंदना विश्वनाथ सगर, शेवंता बाबुराव कदम, महानंदा पंडित साखरे, भारतबाई बाबुराव सुतार, भारताबाई धोंडीबा बोंगरगे, सुनिता जीवन लोखंडे, अश्विनी अनिल मोरे, सुषमा लक्ष्मण कदम, हिराबाई आनंदराव नळगे, शालनबाई शिवशंकर औसेकर, सोनाबाई विठ्ठल कुंभार, गजराबाई कल्लाप्पा कुंभार, मंगल अंगद सगर, शारदा भीम कदम, ललिता आप्पाराव येनकुळे, गंगावती बाबासाहेब गवंडी या महिलांनी विमानातून हवाई सफर करण्याचा आनंद लुटला.
या प्रवासात स्वतः गजेंद्र कदम, पत्नी सौ. सुलभा कदम, मुलगी कु. नम्रता कदम, मुलगा सयाजी कदम व माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम यांनी सेवा बजावली. समाजात स्वतः व कुटुंब याच्यामध्येच अनेक्जण गुरफटत असतात. परंतु समाजाप्रती काहीतरी करावे. या संकल्पनेतून ही' हवाई सफर 'घडली आहे. असा योग घडवून आणणे हे फार कठीण असते. परंतु गजेंद्र कदम आणि हा योग घडवून आणून सर्वसामान्यांच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवले आहे.