नळदुर्ग , दि .१६
अक्षरवेल साहित्य मंडळाच्यावतीने नळदुर्ग येथे संयुक्त कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
कविसंमेलनाचे अध्यक्ष रेखा ढगे प्रमुख उपस्थिती -जेष्ठ लेखिका कमल नलावडे , प्राचार्य डॉ सुलभा देशपांडे , स्नेहलता झरकर , प्रा .डॉ जयश्री घोडके , प्रा सुनिता गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम निसर्गरम्य नळदुर्ग जवळील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदीर , खंडाळा धरण , निसर्गाच्या सानिध्यात काव्याचा वर्षाव झाला .
जेष्ठ लेखिका कमल नलावडे ,रेखा ढगे
स्नेहलता झरकर ,किरण देशमाने ,अपर्णा चौधरी ,मीना महामुनी ,सुलभा देशमुखअस्मिता बुरगुटे, सुनिता गुंजाळ,अर्चना गोरे , ज्योती कावरे ,अनुराधा उपासे ,कविता पुदाले जयश्री घोडके , मिलन कासार ,ऋतिका सोमवंशी यांनी
बहारदार कविता सादर केल्या.
रेखा कशाला उगी मी डाय केला सादर केलेल्या विनोदी हजलला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
तसेच कमल नलावडे यांच्या गाते उजेडाची गाणी घ्या कवितेला उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक -रेखा ढगे यांनी तर सुत्रसंचालन सुनिता गुंजाळ , आभार जयश्री घोडके यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजक
कविता पुदाले यांचे होते . यावेळी सहभागी
सर्व कवयित्रीना सन्मानपत्र देऊन
सन्मानित करण्यात आले .