तुळजापूर ,दि . १६ :
तुळजापुर तालुका शिक्षक भारती संघटनेतील शिक्षिकासाठी विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा व शिक्षक भारती संघटनेच्या धोरणाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षक लोकभारती संघटनेचे नेते तथा पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचा दुवा असलेले शिक्षक आमदार कपील पाटील व शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या सुचनेनुसार तुळजापूर तालुक्यातील सर्व शिक्षक भारती संघटनेतील शिक्षकांची तुळजापूर येथे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बलभीम भोयटे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत शिक्षक भारती संघटनेची धोरणे, संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कार्याविषयी अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बलभीम भोयटे, धनाजी ठोंबरे, प्रदीप मोरे, सुभाष जाधव, नारायण केदार, श्रीमती वासंती गायकवाड, आबासाहेब मगर, मधुकर राठोड, श्रीमती वैशाली जावळे, श्रीमती भारती हजारे, श्रीमती सुवर्णा शिवकर, श्रीमती निर्मला राठोड, श्रीमती शुभदा कुलकर्णी, हेमंत जोशी, बसवेश्वर परकाळे, शिंदे शिवाजी,साखरे सतीश,कोरे महाळाप्पा, राजेंद्र राठोड,खैरे संदीप,श्रीमती सुर्यवंशी सुनिता,राठोड शिवाजी, अंधारे दिलीप,सोनटक्के रेखा, गायकवाड संजय , श्रीमती लांडगे द्रोपदी, रामकृष्ण मोहिते, संजय श्रीनामे आदीजण उपस्थित होते.