तुळजापूर दि १४ :
शारदीय नवरात्र महोत्सव महानवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडावर होमा वरील धार्मिक विधी अत्यंत उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी अजाबली विधी रोमहर्षक वातावरणात शांततेत संपन्न झाला.
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने अष्टमीला सुरू झालेल्या होमकुंडावर मध्ये नवमीच्या दिवशी कामावरून धार्मिक विधी यजमान डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले . त्यानंतर महा नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता अजाबली हा धार्मिक विधी संपन्न झाला, सकाळी तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजा संपन्न ली, आज आपली विधि पाहण्यासाठी भाविकांनी मर्यादित संख्येत गर्दी केली होती पोलिस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता तुळजाभवानी देवीचे पुजारी सेवेकरी आणि मंदिर संस्थांचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते . मंत तुकोजी महाराज, महंत हमरोजी महाराज, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी , पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्य पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, यांच्यासह इतर पुजारी बांधव उपस्थित होते.
अष्टमी दिवशी रात्री भवानी मातेचा छबिना अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला चरण तीर्थ आणि प्रक्षाळ पूजा या दिवशी विधिवत करण्यात आली या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक मानकरी पुजारी सेवेकरी यांनी मनोभावे पूजा केली. कामावरून धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली.
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने भरणारी तुळजाभवानी देवीची मोठी यात्रा प्रशासनाच्या वतीने होणार नसल्याचे जाहीर केले आहे या अनुषंगाने जिल्ह्यांमध्ये वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे याकाळात संचारबंदी लागू असेल असेदेखील प्रशासनाच्यावतीने यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे मात्र शहरांमध्ये भाविकांना प्रवेश द्यावा आणि महाद्वार दर्शन या काळात करण्यात यावे अशी लोकभावना आहे, महादेवाचे दर्शन घेऊन प्रसाद घेऊन भाविकांना शहराबाहेर सोडण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी आहे.