उमरगा , दि .१२ :
उमरगा तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैद्य बायोडिझेल विक्री धंद्याविरुद्ध कारवाई मोहीम सुरू करा ,अन्यथा सर्वसामान्य कुटुंबातील बेरोजगार तरुणांना बायोडिझेल विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी उमरगा तालुका छावा क्रांतिवीर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे .
उमरगा तालुक्यातील येळी, जकेकुर चौरस्ता येथील औद्योगिक वसाहत,तुरोरी,
धाकटीवाडी तसेच तालुक्यातील अन्य ठिकाणी विनापरवाना बायोडिझेलची विक्री केली जात आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस प्रशासनासह महसूल विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा
आरोप देखील करण्यात आलाय .
याबाबतचे निवेदन 11 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. निवेदनावर छावा क्रांतिवीर सेनेचे तालुकाध्यक्ष विष्णु भोसले, शहराध्यक्ष सुमित घोटाळे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील,
आय. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष शैलेश लोखंडे, तालुका संघटक ज्ञानेश्वर भोसले आदींच्या सह्या आहेत.