तुळजापूर ,दि .१२
तुळजाभवानी महाविद्यालयास ५० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल तुळजाभवानी काँलेजच्या सुवर्ण मोहत्सव वर्ष बाबत आढाव बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर,नगराध्यक्ष सचिन रोचकरी , सदरील मोहत्सवा समितीमध्ये जेष्ट सदस्य आशोक मगर, प्राचार्य देशमुख ,माजी प्राचार्य दापके ,तुळजाभवानी काॅलेजचे प्राचार्य मणेर आदींच्या उपस्थितीत सन २०२१,२०२२ सुवर्ण मोहत्सवर्षामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत , काँलेजच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
या मोहत्सवामध्ये नगर परिषद,सर्व नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी,उधोगपती , शहरातील माजी विद्यार्थी,सामाजीक कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातुन सदरील काँलेजच्या सुवर्ण महोत्सव वर्षासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल अशी ग्वाही नगराध्यक्ष सचिनरोचकरी यांनी दिली.