नळदुर्ग , दि .३ :
येडोळा ता.तुळजापूर येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ स्वाभिमानी कार्यकर्ते गोरख पांडुरंग लोंढे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी शनिवार दि.०२अक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
दिवंगत गोरख कांबळे हे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत एक निष्ठावंत धडाडीचे कार्यकर्ते होते .दि.०३ अक्टोबर रोजी येडोळा येथील स्मशानभूमीत बौद्ध धम्म पध्दतीने त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. या प्रसंगी रिपाइंसह विविध पक्ष व संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगा सुना जावाई नातवंडे असा परिवार आहे.