तामलवाडी:- दि  ३ : 

 येथील सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी ता. तुळजापूर येथिल     शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी   पंतप्रधान  लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली .


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन मल्लिकार्जुन मसुते तर प्रमुख पाहुणे त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष   बसवणप्पा चंद्रकांत मसुते , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत  लोंढे, संचालक गोरख माळी ,अब्बास  पटेल ,नागनाथ मसुते, बाळासाहेब जगताप, प्राचार्य सुभाष जाधव व  पर्यवेक्षक गणेश हलकरे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तर सामाजिक अंतर ठेवून   सुहास वडणे यांनी जयंतीच्या कार्यक्रमाविषयी   सविस्तर माहिती दिली .   यावेळी  औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव  सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे  ,महादेव मसुते,  महादेव माळी , लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे , गिरीश जाधव ,योगेश राऊत,  गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील,  महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत ,विठाबाई पाटील आदी उपस्थित  होते. सुहास वडणे यांनी सूत्रसंचालन केले. 
 
Top