मुरूम, दि.  २० 

  येणेगूर, ता. उमरगा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरण उपोषण बुधवारी  रोजी विश्वनाथ बाबुराव स्वामी, अजय गायकवाड यांनी ग्रामपंचायत समोर प्रमुख मागण्यासाठी करण्यात आले.


  यामध्ये येणेगुर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ मध्ये संपादित शासकीय गावठाण जागाचे चुकीचे कागदपत्र जोडून जागा हडप करून ग्रामपंचायतमार्फत चुकीचा ८ अ तयार करणे, स्थानिक पंचनामा चुकीचा दाखवल्यामुळे भूसंपादन कार्यालय, उस्मानाबाद व त्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपूर्ण मोबदला लाटून खाण्यात आला आहे. त्याची नि:पक्षपणे चौकशी होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती न करता अनामत रक्कम हडप केली. याबाबत व शाळेतील जुने सागवानी आडू आपण विक्री केलात का ? किंवा गोदामात शिल्लक आहेत का ? ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी १४  वा वित्त आयोग व ग्रामनिधीतून झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी व ग्रामनिधीच्या वसुलीची चौकाशी करणे. या  प्रमुख मागण्या नवनिर्माण सेनेकडून मांडण्यात आल्या. 



या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उमरगा-लोहारा तालुक्याचे मनसेचे विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने, संजय माने, भाजपा तालुका कार्यकरणी सदस्य सुधाकर धामशेट्टी, भाजपा तालुका चिटणीस सागर पाटील, तालुका प्रसिद्धीप्रमुख भाजपा विवेकानंद हंगरगे, जनशक्ती प्रहार संघटना तालुकाप्रमुख  अजीम खजुरे, ऋतिक सूर्यवंशी, हुसेन मुल्ला, धनंजय गुरुळे, महेबूब शेख आदींनी या उपोषणाला  पाठिंबा दिला आहे.
 
Top