अककलकोट दि.२०
कोतवाल संघटनेची बैठक दि. 20 रोजी जुना तहसिल कार्यालय अककलकोट येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकी दरम्यान, जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज मिटींग आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोतवालांच्या कर्मचारी पदोन्नतीबाबत, शासन् निर्णय नुसार अमलबजावणी तात्काळ करणे, सेवा पुस्तक अद्यावत ,अर्जित रजा शिल्लक रक्कम, सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध ,राज्य स्तरीय प्रलंबित मागणी अशा विविध मागण्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, दरम्यान वरील मागण्या 26 तारखेपर्यंत मान्य न झाल्यास
27 तारखेला एक दिवसीय धरणे आंदोलन व 28 रोजी पासून जिल्ह्यातील सर्व कोतवाल कर्मचारी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय जिल्हा बैठकीत झाला असल्याची महिती जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव यानी सागितले आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष शफी वाडीकर, चौडपा कुंभार, बदेनवाज डफेदार, जिल्हा सहसचिव, प्रविण गुंजले, शिवानद कोळी, सचिव, उपाध्यक्ष रेवणसिद्ध सुतार, सुनिल मुलगे अर्जुन सनके बाबु कोरबु जाकीर कागदे, हसन मुजावर एन के मुजावर, सोमु आलुरे, मातु नागुरे,आर एस कुंभार, फिरोज ताबोळी, दत्ता कोळी, सुर्यकांत रामपुरे, अर्जुन सनके, रजाक जमादार, हणमंत सानप, स्वामीनाथ जमादार, सैपन पठाण बसवराज गायकवाड, शिवशरण कोळी, व इतर पदाधिकारी कोतवाल बांधव उपस्थित होते.