उमरगा : दि .२० :
गाव पातळीवर स्वयंम शिक्षण प्रयोग अंतर्गत गाव पातळीवर लीडर म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी उमरगा येथे बुधवारी दि 20 रोजी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये विविध विषयासह कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले
उमरगा पंचायत समिती तसेच स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत पंचायत समितीचे बाल विकास अधिकारी डि.के. वाघ, तालुका कृषी अधिकारी महेशकुमार बिडवे ,आरोग्य विस्तार अधिकारी एम एम कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले
कोविड 19 लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी लीडर महिलांना माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंम शिक्षण प्रयोगाच्या तबसुम मोमीन यांनी केले मोहिमेत प्रकल्प उद्देश , कामाची व्याप्ती, करावयाची कामे तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्या लिडरची जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले
स्वयंम शिक्षण प्रयोगचे बाळासाहेब काळदाते , माधव गोरकट्टे ,दीपाली थोडसरे, आकाश लष्करे यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदशन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक शीतल रनखांब ,अंजना साबळे यांनी यांनी परिश्रम घेतले सूत्र संचलन स्वयंम शिक्षण प्रयोगचे माधव गोरकट्टे यांनी केले