नळदुर्ग एस.के.गायकवाड:
नळदुर्ग नगरपरिषदेचे नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील एक पँथर, स्वाभिमानी आणि संयमी नेतृत्व दयानंद आप्पाराव
बनसोड यांचे मंगळवारी निधन झाले असून त्यांना बुधवारी आलियाबाद स्मशानभुमीत सहाश्रुनयनानी उपस्थित जनसमुदायानी आखेरचा निरोप दिला.
नगरसेवक दयानंद बनसोडे यांचे दि.१९आँक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता सोलापूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 59 वर्ष होते. दि.२० आँक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर बौध्द धम्म संस्कार नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत दयानंद बनसोडे हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. सलग तीन टर्म ते भीमनगर, बुद्ध नगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या ते नळदुर्ग न.प.चे विद्यामान नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती होते. दि.१८ आँक्टोबर २०२१ रोजी आयोजित न.प.ची सर्व साधारण सभा ही त्यांची अखेरची सभा ठरली. या सभेत त्यांनी नळदुर्ग बसस्थानका समोरील चौकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक असे नाव द्यावे असा ऐतिहासिक ठराव मांडला. तो सर्वानूमते सहमतही झाला आहे.
त्यांच्या निधनाने एका स्वाभिमानी व संयमी कार्यकर्त्याला आपण पोरके झालो आहोत आशा भावपूर्ण शब्दात उपस्थितानी त्यांना
श्रध्दांजली वाहीली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, नगरसेवक शहबाज काझी, मुस्ताक कुरेशी, निरंजन राठोड, विनायक अहंकारी, बसवराज धरणे, नितीन कासार , महालिंगया स्वामी , शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर , घोडके काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , मारुती खारवे , अझर जाहागिरदार , माजी नगरसेवक संजय बताले , अमृत पुदाले , न. प .चे कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार , भोईराजचे सुनिल उकंडे, ,रिपाइंचे आनंद पांडागळे, तानाजी कदम,बाबासाहेब मस्के, अरूण लोखंडे, एस.के.गायकवाड, अरुण कदम, वंचित आघाडीचे आर.एस.गायकवाड, अंकुश लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते मारूती बनसोडे, पंडीत भोसलेसह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.