काटी , दि . २१ उमाजी गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी येथील मावळे सांस्कृतिक,कला, व‌ क्रिडा मंडळाच्या वतीने  नवरात्रोत्सवनिमित्त तळागाळातील सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा,  रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज करणारा दिमाखदार लावणी महोत्सव संपन्न झाले. 


 प्रारंभी सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,मकरंद देशमुख, भैरी काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माजी प्राचार्य अशोक लाटकर पती, पत्नी यांच्या हस्ते भवानी देवी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व‌ आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     
 या कार्यक्रमात स्त्री वेषात इंटरनॅशनल गोल्ड मिडॅलिस्ट लावणी सम्राट गणेश देशमुख (लातूरकर), पुण्याची मैना तेजू पुणेकर, व लावणी रत्न नॅशनल गोल्ड मिडॅलिस्ट राज सरवदे यांच्या धमाकेदार अनेक सदाबहार लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले. मिक्स लावण्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. रसिक प्रेक्षकांनी सतत टाळ्यांच्या कडकडाटात, शिट्ट्यांच्या निनादात, बक्षिसांची खैरात करीत विविध बालकलावंतानी सादर केलेल्या गीतांना मनमुराद दाद दिली.  आकर्षक विद्युत रोषणाईने  परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले .
     

पुण्याची फटाकडी, दिलबरा विडा रंगला ओठी, विचार काय हाय तुमचा, मला म्हणतात हो पुण्याची मैना, तुळजाभवानीची शान, छबीदार छबी, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, ढोलकीच्या तालावर, तेरे आँखो कायो काजल या सामुहिक नृत्य गीतांवर महिलांसह रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नंदिनी पवार या बालकलाकाराने आपल्या अदाकारीने सादर केलेल्या "तेरे आँखो कायो काजल" या गीताला महिलांसह रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षरशः डोक्यावर घेतले. सामूहिक नृत्य, देवींचे गीते,  लावणी,फ्यूजन डान्समध्ये गणेश देशमुख, तेजू पुणेकर, व राज सरवदे (कळंबकर) यांच्यासह  मावळे मंडळातील बालकलावंताच्या
 सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन जुबेर शेख यांनी केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश गाजरे, दिपक हांडे,जुबेर शेख, समीर पठाण, शुभम हांडे, अभिजित माळी, वैभव माळी, मुस्तफा पठाण, अमजद शेख, सचिन शिंदे, अरबाज शेख,रोहन कुंभार, प्रसाद कुंभार, बबलू गायकवाड, ऋषिकेश देशमुख, रजनीकांत राठोड आदींनी परिश्रम घेतले.
 
Top