तुळजापूर , दि .२१ राजगुरू साखरे :
तुळजापूर तालुक्यातील परिसरात पेरणीच्या हंगामात सोयाबीनला तब्बल दहा हजारपेक्षा अधिक दर मिळाला होता . परंतु ऐन शेतकर्यांचे सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनचे दर घसरतात याला जबाबदार कोण ? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत ,सध्या परिसरात सोयबीनची काढणी व मळणी अंतिम टप्प्यात आली असून हंगामाच्या तसेच दिवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनचे दर दहा हजार प्रती क्विंटलवरून चार हजार नऊशे रूपयवार आल्याने शेतक्यातून नाराजी व्यक्त होत आहे.
.ऐन सणसुदीत शेतकर्यांना दर घसरल्याने दिवाळी सण कसा साजरा करायचा ,असा प्रश्न शेतक्र्यसमोर आहे.यंदा सप्टेंबर व आक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिव्रस्टी मुळे संपूर्ण सोयबीन पीक हातचे गेले आहे. जे शिल्लक असलेले पीक चिखल तुडवत काढण्यची वेळ शेत्क्र्यावर आली आहे .
पावसामुळे पीक खराब झाले तरी सोयाबीन पीक मोठ्या हिमतीने काढून शेतकर्यांनी बाजार दाखल केले ,आता समाधानकारक दर मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आगस्ट महिन्यापर्यंत आकरा हजार रुपये दराने विकणारे सोयाबीन आक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४९०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे .अगोदरच अतिव्रष्टी मुळे सोयाबीन चे नुसकण झाले असताना आता पुन्हा सणाच्या तोंडावर दर कोसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दुहेरी फटका बसला आहे .