जळकोट,दि.२१ : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेटच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तुळजापूर पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले बोरगाव शाळेचे मनोज चौधरी, जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे श्रीमती सुरेखा राठोड, जळकोट येथील शिक्षण विस्ताराधिकारीपदी पदोन्नती मिळालेले शिवाजी सुरवसे, जळकोट येथील अंबवा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुरा कारभारी यांना सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनचा डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल व पुणे येथील उद्योजक राजेंद्र सोनटक्के यांचा प्रयाग मल्टीस्टेट च्या वतीने सुनील कदम व चेअरमन सचिन कदम यांच्या हस्ते भेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास शिवाजी कदम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष डी. डी. कदम, सुनील कदम, अरुण लोखंडे, विजयकुमार मोरे, श्रद्धानंद स्वामी, महादेव पवार, शेषराव कदम, निळकंठ इटकरी, रमेश औसेकर, शशिकांत कुलकर्णी, सिद्धेश्वर कुंभार, बालाजी माळी, अमित खारे,डॉ. संजय कदम, मनोज कदम, ताजुद्दीन शेख, ब्रह्मानंद कदम, श्रीकृष्ण कदम, साखरे, श्रीमती राजमाने, राजेंद्र चव्हाण आदीसह, संचालक मंडळ, शिक्षक वर्ग , कर्मचारी उपस्थित होते.
 
Top