अणदुर , दि .२१ : 

अणदूर ता.तुळजापूर येथील जेष्ठ महिला कार्यकर्त्या व दमयंती महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीमती कांताबाई गुरुनाथ कानडे (वय ७५) यांचे गुरुवारी दि.२१ रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने  निधन झाले.

त्यांच्यावर शुक्रवारी दि.२२ सकाळी १० वाजता अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार असून अणदूर ग्रामपंचायत सदस्य व रविशंकर विद्यामंदिरचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे व उमरगा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ राजकुमार कानडे यांच्या मातोश्री होत.
 
Top