वागदरी, दि .२३: एस.के..गायकवाड

भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीत सहभाग या कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यात आले आहे. 


परीक्षा मंडळाच्या नियंत्रणाखालील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सदर निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यात आला आहे .विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया बद्दल माहिती हवी, त्यांच्यामध्ये भावी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याविषयी, मतदान करण्याविषयी तसेच लोकशाही विषयी जागरूकता निर्माण करणे हा निवडणूक साक्षरता मंच स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांमधून निवडणूक साक्षरता मंचचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक पांडूरंग पवार व सह शिक्षक तथा नोडल अधिकारी  भैरवनाथ कानडे यांच्या उपस्थितीत सहाय्यक नोडल अधिकारी  सत्यवान गायकवाड यांची तर विद्यार्थ्यांमधून , ज्ञानेश्वर मोटे, गोरक्षनाथ नाथजोगी ,साईनाथ मोटे,  संयोगिता जोगी, अपेक्षा गायकवाड, सागर गरड ,मीरा जाधवर आदींची कार्यकारी समिती निवडण्यात आली. या या मंचाच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता परस्परसंवादी शाळा संवाद .कार्यक्रम, जागतिक मतदार दिन, निवडणूक साक्षरता सप्ताहाचे आयोजन, निवडणूक शिक्षणाशी संबंधित वादविवाद,लघुपट निर्मिती, घोषवाक्य ,चारोळी ,कविता लेखन , परिसंवाद कविता लेखन,चर्चासत्र,लोकशाही या विषयावरव्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, भितीपत्रके , पोस्टर बनविणे, याशिवाय निवडणूक आयोगाने निश्चित  केलेल्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सहशिक्षक महादेव गरड, वामन चव्हाण आदीसह विद्यार्थी, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top