पुणे, दि .१९ : आनंदयात्री या फेसबुक समूहातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या शनिवार (ता. २०) आणि रविवारी (ता. २१) करण्यात आले असून कर्वेनगरमधील गेम ऑन स्पोट्र्स क्लब येथे ही स्पर्धा होईल. या
स्पर्धेत पुण्यासह मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा तसेच विदर्भ येथील १६ संघांचा सहभाग असेल, अशी माहिती आनंदयात्री समूहाचे संचालक राम चिंचलीकर यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.