नळदुर्ग , दि .१९ : विलास येडगे

 मराठा गल्ली येथे एक महिन्यापासुन सुरू असलेल्या काकडा आरतीचा समारोप दि.१९ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला.
    

सालाबादप्रमाणे याहीवर्षी  नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे दि.१९ ऑक्टोबर पासुन काकडा आरतीस प्रारंभ करण्यात आला होता. 

गेली एक महिनाभर हा काकडा आरतीचा कार्यक्रम मराठा गल्ली येथील विठ्ठल--रुक्मिणी मंदिरात सुरू होता. दररोज पहाटे महिला श्री विठ्ठल--रुक्मिणी ची पुजा करून तब्बल एक ते दीड तास भजन करीत असत.भजन व आरतीमुळे पहाटेचे वातावरण भक्तीमय व प्रसन्न वाटत होते. मराठा गल्ली येथील दीपाली धनाजी जाधव, छाया तानाजी मुळे, वनिता प्रदीप चौधरी, शशिकला रमेश चौधरी, शकुंतला किसन जाधव आशा अण्णाराव जाधव, जयश्री महादेव जाधव, छाया शहाजी पवार, मंगल मनोहर सावंत, नीता तानाजी जाधव, लता गिरीधर साळुंके, कांताबाई वसंत कदम, सुक्षम अरविंद माने, सुमन नेताजी किल्लेदार,सरुबाई राम महाबोले, विमल निवृत्ती काळे, सृष्टी राहुल माने, ऋतुजा हरीदास कदम, अनुजा नेताजी जाधव,लक्ष्मी विजय किल्लेदार या महिला गेली महिनाभर पहाटे मंदिरात येऊन काकडा आरती करून भजन व देवाची गाणे म्हणत होते.दि.१९ नोव्हेंबर रोजी काकडा आरतीच्या समारोपावेळी विठ्ठल--रुक्मिणी मंदिरात महिलांनी दीप लाऊन दीपोत्सव साजरा यावेळी पहाटेच्या सुमारास दिव्याच्या प्रकाशात मंदिर उजळुन निघाले होते.काकडा आरतीच्या समारोपादिवशी सरकार तानाजी जाधव यांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरांतील मराठा गल्ली येथे कायम सतत वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात यामुळे येथील वातावरण प्रसन्न असते.

 
Top