मुरूम, दि. १७
येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत महा ग्राहक परिचर्चा संवाद कार्यक्रम मंगळवारी दि..१६ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप होते. यावेळी अचलेर बँकेचे शाखाधिकारी राजेश कुमार, मुरुम शाखाधिकारी अरविंद नायक, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, विनोद गायकवाड, अतिक अत्तार आदी होते. यावेळी नेट बँकिंगच्या सायबर क्राईम बाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सपोनि जगताप यांनी केले.
प्रारंभी व्यवस्थापक अरविंद नायक यांनी जगताप यांचा शाल, श्रीफळ तसेच सत्यमेव जयते स्थंभ भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी अचलेर बँकेचे राजेश कुमार यांनी नेट बँकिंग व एटीएम मशीन वापरा बाबत माहिती दिली. या कार्यक्रमात प्रा. डॉ. महेश मोटे, रामलिंग पुराणे आदींनी मनोगत व्यक्त केले. नागरी संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कायम तत्पर असते, या महा ग्राहक परिचर्चा संवाद व पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करणे व तसेच नागरिकांनी बँकेची माहिती देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे बँक शाखाधिकारी अरविंद नायक यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपव्यवस्थापक बालाजी मरे यांनी मानले.
व्ही व्यंकटेश, मुख्य रोखपाल प्रनित बागडे, कर्मचारी प्रवीण जोडे, भीमाशंकर कलशेट्टी, प्रवीण भालेराव याचबरोबर अचलेर शाखेचे उपव्यवस्थापक गोपाळ कृष्ण, रोखपाल रंगा बनौत, बिजिनिस करस्पॉंड्नन्ट जाहिद बेग आदींनी पुढाकार घेतला.