तुळजापूर , दि .३०
महाराष्ट्र राज्य पेन्शन संघर्ष समन्वय समिती आयोजित पेन्शन संघर्ष यात्रेची दि. 22 नोव्हेंबर रोजी मुंबई येथून सुरूवात झाली असुन ही पेन्शन यात्रा तुळजापूर तालुक्यात सकाळी 9 वाजता आगमन झाले. यावेळी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तुळजाभवानी मातेला 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,मयत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन तात्काळ सुरू करावे व तमाम कर्मचाऱ्यांमधील असंतोष दूर करण्यासाठी संघर्ष समनवय समितीच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेण्याची सद्बुद्धी राज्य शासनास द्यावी यासाठी आई तुळजाभवानी मातेस तुळजापूर मध्ये आरती करून साकडे घालण्यात आले.
यावेळी संघर्ष समन्वय समितीचे प्रमुख वितेश खांडेकर (राज्याध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य) यांच्यासोबतच गोविंद उगले, प्राजक्त झावरे, सुनील दुधे, संजय सोनार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यादरम्यान संघर्ष समन्वय समिती तुळजापूरच्या वतीने राज्यावरून आलेल्या अतिथींचे/ लढवय्या शिलेदारांचे देवीचा फोटो,श्रीफळ व गुच्छ देऊन तुळजापूर नगरीत भव्य स्वागत केले -स्वागताचा हा कार्यक्रम पुजारी मंडळ येथे पार पडला . संघर्ष यात्रा स्वागतासाठी तुळजापूर तालुक्यातून बहुसंख्य शिक्षक ,तसेच जिल्हाभरातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, विक्रम पाटील, बिभीषण पाटील, धनंजय मुळे, बशीर तांबोळी, काशीनाथ भालके, चंदन लांडगे, विशाल अंधारे, सुखदेव भालेकर, डी.एस. वाघमारे उपस्थित होते.