वागदरी , दि .०१ : एस.के.गायकवाड


कोरोना विधवा व आत्महत्याग्रस्त विधवा यांना प्राधान्याने शासकिय योजनांचा लाभ देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम शासकिय यंत्रणेतील सर्व अधिकारी व स्वयसेवी संस्था , CSR कंपन्या यांच्या सहकार्याने करण्यात येणार असून एक हि महिला शासकिय योजने पासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन  तहसीलदार तथा मिशन वात्सल्य समितीचे अध्यक्ष  सौदागर तांदळे यांनी  तुळजापूर येथे मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले. 


 या कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत हावळे ,सहाय्यक गटविकास  राऊत  , सभापती रेणूका इंगोले ,मिशन वात्सल्य समितीचे सदस्य गणेश चादरे , मारुती बनसोडे  , बाबई चव्हाण ,दत्तात्रय शेरखाने ,सोनिया हंगे बालविवाह प्रतिबंधक समितीच्या जिल्हा समन्वयक उस्मानाबाद इत्यादि उपस्थित होते.

यावेळी गणेश चादरे ,मारुती बनसोडे, बाबई चव्हाण , श्रीकांत हावळे यांची भाषणे झाली. 
तुळजापूर तालुक्यातील कोरोना विधवा व आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचे सर्वेक्षण फॉर्म भरुन घेण्यात आले.२०१ महिलांनी फॉर्म भरला आहे. एकूण २५० महिला उपस्थित होत्या. 

यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती ही देण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन 
अंगणवाडी पर्यवेक्षीका राठोड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश चादरे यांनी मानले.

 
Top