अणदूर , दि .०१ :
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे बीटचे विस्तार अधिकारी सौ राऊत आणि शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख बळवंत सुरवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिक्षक नेते पवन सुर्यवंशी यांनी केंद्रप्रमुख बळवंत सुरवसे व शिक्षिका सौ कुलकर्णी यांनी शाळेला भेट दिल्याबद्दल विस्तार अधिकारी सौ राऊत यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की ,आमची शाळा तशी 15 जून पासून चालूच होती ,कारण जरी शासनाचे आदेश नसले तरी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही मुलांना शाळेत बोलवून व काहीना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्या!नंतर स्वतः विस्तार अधिकारी यांनी शाळेतील प्रत्येक वर्गात जावून भेट देवून विध्यार्थ्य बरोबर अभ्यासाबाबत चर्चा केली.
तसेच सध्या कोरोनामुळे मुलांचे नुकसान झाले आहे. ते आपण ज्यादा तास घेऊन भरून काढावे व सध्या मुलांना बेसिक क्रिया अवगत करून घ्याव्या अशा सूचना दिल्या.
इयत्ता 3 री चे वर्ग शिक्षक प्रकाश जाधव आणि 1 ली चे वर्ग शिक्षिका सौ शुभदा कुलकर्णी यांचे वर्गातील मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या मुळे दोन्ही वर्गशिक्षक यांचे अभिनंदन केले.
येडोळा शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव व शाळेतील शिक्षक बसवेश्वर परकले, राजेंद्र सुतार, बबन गोरे, प्रकाश जाधव, गोविंद नांदे, शिवानंद धमे, गुरूलिंग धावणे, पवन सुर्यवंशी सर,सौ शुभदा कुलकर्णी हे उपस्थित होते.