इटकळ , दि .०१
सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार इटकळ ग्रामस्थांच्या वतीने नागरि सत्कार करण्यात आला. रफिक नवाज मुजावर यांनी 17वर्ष देश सेवा करुन आपला कार्यकाळ संपवुन दि . १ डिसेंबर रोजी गावी इटकळ ता. तुळजापूर येथे आले.यामुळे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, राजॳहमद पठाण, वसंत वडगावे अरविंद पाटील,महमद इनामदार, शिकुर मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी 10 वाजता गावशिवारावर मेजर रफिक मुजावर यांचे आगमन होताच उघडल्या जिपमधुन गावांमध्ये मोटार सायकल रॅली सह मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
परिसरातुन आलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी फिरोज मुजावर, अमोल पाटील, अस्पाक मुजावर, महादेव सोनटक्के, श्रीकृष्ण मुळे, राहुल बागडे,सायबा क्षिरसागर, दिनेश सलगरे, राम मंडलीक यांनी पुढाकार घेतला.