वागदरी , दि .०१ एस.के.गायकवाड
नळदुर्ग शहरातील पत्रकार ईरफान अबुजर काझी याना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने लातूर येथे आयोजित मराठावाडा विभागीय आधिवेशनात दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लातुर येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागस्तरिय आधिवेशन सपन्न झाले. याआधिवेशनात सलग २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार ईरफान काझी यांच्या कार्याची दखल घेऊन त्याना पत्रकार संघाच्या वतीने आँल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विश्वास आरोटे,मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी,राष्ट्रीय संत ह.भ.प.एकनाथ महाराज आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह, सन्मान पत्र ,शाल व बुके देऊन दर्पण पुस्काराने सन्मानीत करण्यात आले.
ईरफान काझी याना सदर पुरस्काराने सन्मानीत केल्या बद्दल पत्रकार संघाचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष भैरवनाथ कानडे,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, सचिव एस.के.गायकवाड, पत्रकार संघाचे किशोर धुमाळ, सचिन गायकवाड, संजय पिसे,शिवशंकर तिरगुळे आदींनी आभिनंदन केले.