तुळजापूर , दि. ०१
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे गुरूवार दि. २ डिसेंबर रोजी बक्षिस व विविध पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहे.
जनशुभदा फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी आमदार कैलास पाटिल तर उद्धघाटक म्हणुन अनाथाची माय सिंध्दूताई सपकाळ या उपस्थित राहणार आहेत . तसेच सरपंच लोचना दबडे,माई हिप्परगे,सुनिल बंडगर,नागनीताई कांबळे, मारूती बनसोडे, यांची प्रमुख प्रमुख उपस्थित राहणार असून उत्कृष्ट पञकार,विकासमुख सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत, कोरोना योद्धा आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी कार्यकर्त्या,आदर्श शिकक्षक, युवा उद्योजक,समाज सेवक सामाजिक कार्यकर्ते, यांच्यासह
विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच सिंध्दूताई सपकाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी लोहगावसह नंदगाव जिल्हापरिषद गटातील व परिसरातील नागरीक उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजक व जनशुभदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गुड्डे यांनी केले आहे.