अणदूर , दि . ०१ 


अणदुर ता. तुळजापूर येथील दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रति वर्षी देण्यात येणारा सेवानिवृत्त शिक्षक पुरस्काराचे वितरण अणदूर येथे शुक्रवार दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ,हुतात्मा सभागृहात होणार असून या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले आहे.


कै. दत्तात्रय अणदूरकर गुरुजी यांच्या 5 व्या स्मृतिदिन निमित्य या वर्षीचा पुरस्कार  शिक्षक श्रीमंत मुळे, श्रीमती पाटील  व नागेंद्र भिक्यागोळू गुरुजी या तिघांना देण्यात येणार असून,या कार्यक्रमाचे अध्यक्ष अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामपा खजुरे, व आकाशवाणी सोलापूरचे जेष्ठ निवेदक अभिराम सराफ हे भूषवणार आहेत, "सेवानिवृत्त नंतर चे जीवन कसे आनंदी व सुखकर जगावे"या विषयावर मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमाचा लाभ अणदूर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले आहे.

 
Top