काटी , दि . ०२ ः उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीची कन्या तथा प्रा. अभिमान हंगरकर यांच्या भगिनी सौ. शामल माणिकराव शिंदे यांना नुकताच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे येथे संविधान दिनाचे औचित्य साधून ह्युमन राइट्स फाउंडेशन रिपब्लिकन मायनॉरिटी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित क्रिडा, पोलीस, आरोग्य, शैक्षणिक, व्यवसायिक, व संस्कृती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये काटीची कन्या तथा ब्लासम पब्लिक स्कूल ताथवडे पुणे क्रिडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. शामल माणिकराव शिंदे यांचा ह्युमन राइट्स फाऊंडेशनचे रिपब्लिकन मायनॉरिटी फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल साठे, फिरोज खान, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल, विक्रम पवार आदी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पुणे येथे क्रिडा रत्न' पुरस्काराने सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ह्युमन राइट्स फाउंडेशनचे सुनिल साठे, फिरोज खान, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल, विक्रम पवार, माणिकराव शिंदे, मनिषा पाटील, सुधा खोले, पुरस्कार प्राप्त व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या ग्रामीण भागातील महिलेने पुण्यात क्रिडा रत्न पुरस्कार मिळवून उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल पुरस्कार प्राप्त शामल शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.