तुळजापूर , दि . ०२
तुळजापूर शहरातील महावितरण कार्यालयास गेली तीन ते चार महिने पासून सहाय्यक अभियंता नाही. या अगोदरचे सिंग हे बदली होऊन गेल्यापासून हे पद रिक्त आहे.
तुळजापूर शहर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे भाविक -भक्त ,पुजारी ,व्यापारी व शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने वीज पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्याकरिता याठिकाणी सहाय्यक अभियंताचा पदभार तात्पुरता कोणाकडे देऊन काम सुरळीत होणार नाही .तरी शहरासाठी वेगळा अधिकारी असणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांच्या विज संदर्भात तक्रारी सोडवणे सोयीचे होईल, असे निवेदन रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी उस्मानाबाद कार्यकारी अभियंता महेंद्र वाघमारे यांना दिले.