लोहारा , दि . २९ 

      
 शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये पठाण, खडीवाले, शेख व पोतदार यांच्या घराजवळ खडा पडून तुंबलेली घाण पाण्याची गटार व खड्डा येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू नारायणकर व नितीन नारायणकर या भावंडांनी रविवारी (दि.२८) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने मुरूम आणून बुजवल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.   

         
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये पठाण, खडीवाले व शेख यांच्या घराजवळील पाणी पुरवठ्याची मुख्य लाईन फुटल्याने पाईप लाईन दुरुस्तीसाठी नगर पंचायतच्या वतीने मोठा खडा खोदण्यात आला होता. व गटारीचे वाहते पाणी अडवण्यात आले होते. परंतु पाईप लाईन दुरुस्ती केल्यावर खडाबुजवणे व सांडपाण्यासाठी वाट करणे आवश्यक होते परंतु नगर पंचायत प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना तुंबलेल्या गटारीच्या पाण्याचा व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या घाण पाण्याचा नाहक त्रास सहक करावा लागत होता. अखेर लोहारा येथील विष्णू नारायणकर व नितीन नारायणकर या भावंडांनी नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन स्वखर्चातुन जे.सी.बी च्या खोदकाम करुन व मुरुम आणून टाकत खड्डा बुजवून व तुंबलेल्या गटारीच्या सांडपाणी वाहण्यासाठी स्वच्छता व रस्ता करुन दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
Top