नळदुर्ग ,दि .२९ : 

प्राचिन मंदिरे भारतीय  संस्कृतीचे साक्षीदार  आसुन जिथे देव प्रकटले ते स्थान जाग्रत आहेत . अश्या मंदिरांचे संरक्षण प्रत्येक नागरीकांनी केले पाहीजे असे प्रतिपादन नळदुर्ग येथिल श्री.शिवलिंगेश्वर हिरेमठाचे परमपुज्यनिय श्री. श्री.बसवराज शिवाचार्य महास्वामीनी व्यक्त केले.
     

 नळदुर्ग  येथिल ऐतिहासिक जुने मूळ खंडोबा मंदिराचा गेल्या सहा महिन्यापासुन जिर्णोध्दार कार्य सुरु आहे. या कार्यास रविवार दि. २८/११/२०२१ रोजी नळदुर्ग येथिल श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे परमपुज्यनिय महास्वामीजी श्री बसवराज शिवाचार्य महाराज यांनी मंदीरास भेट देवुन जिर्णोध्दार कार्याची पाहणी केली. 


यावेळी श्री बसवराज महास्वामीजी म्हणाले की, हिंदुधर्म हा अखंड आसुन अधर्मी आक्रमकांनी धर्मावर हल्ले करुण अनेक मंदिरे उध्वस्त केली, धर्माचे विभाजन करण्याचाही प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. धर्मात समाज व्यवस्था असली तरी सर्व समाज शिवाशी एकरुप झाला आहे. त्याचेच श्री खंडेराय हे एक उदाहरण आहे. अदिलशाहीत भारतातील अनेक जागृत देवस्थाने अक्रमकांनी जमिनदोस्त केली कांही भ्रष्ठही केली परंतु  हिंदुच्या प्रबळ धार्मिक श्रध्देवर अघात करु शकले नाहीत. कारण या मंदिरातुनच उर्जितावस्था निघत असते. तिथे प्रत्यक्षदेवाचा निवास असतो म्हणुनच पुन्हा मंदिरे मोठ्याप्रमाणात निर्माण  झाली. 


कांही दुर्लक्षित राहीली ती ही आता निर्माण होत आहेत.  प्रत्येक गोष्टीसाठी योग व वेळ यावी लागते तेंव्हाच कार्य होत असते. श्री खंडोबा मंदिराचा योग बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर आला असून देवाच्या इच्छेनुसार हे कार्य होत आहे, तरुणांनी हाती घेतलेले हे कार्य प्रेरणादाई आहे. प्रत्येक कार्यात अडचणी येतच असतात परंतु त्यावर मात करीत जिर्णोध्दार कार्य पुर्ण करावे असे ही महास्वामीजी म्हणाले. प्रारंभी महास्वामीजिंचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी  श्रमिक पोतदार, विलास येडगे, अँड धनराज धरणे, संजय पोतदार शिवलिंग हिरेमठ, ज्योतिर्लिंग बचाटे, विनोद हिरेमठ, राजु मोटे, शशिकांत चौधरी  उपस्थित  होते.
 
Top