काटी , दि . २९ :
तुळजापुर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सांगवी ( काटी ) शिवारात 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने झोडपुन काढल्याने विलास नागनाथ होळकर यांच्या अडीच एकर द्राक्षबागेचे पुर्णता नुकसान झाले आहे.
हवामानातील बदल आणि मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे. पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे गड कुजने, फुलोरा गळणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दावण्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. रोजच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागेवर विविध प्रकारची महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे.
या अवकाळी पाऊसाचा फटका सांगवी (काटी) येथील शेतकरी विलास नागनाथ होळकर यांच्या गट नं. 34 मधील 1 हेक्टर 60 आर. मध्ये द्राक्षबागेला वादळी वारा व अवकाळी पावसाने बसला असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. होळकर यांची अडीच एकर द्राक्ष बाग असून ऑक्टोबर मध्ये छाटणी करुन द्राक्षवेलीला फळ धारणा होण्यास सुरुवात होऊन द्राक्षांचे घड निर्मिती होण्यास गती येत असतानाच 22 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजता अवकाळी पावसाने तब्बल दोन तास अक्षरशः झोडपून काढले पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडात साचून संपूर्ण अडीच एकरावरील द्राक्ष बागेचे घड कुजून अतोनात नुकसान झाले.
महसूल प्रशासनाच्या वतीने सांगवी (काटी) सज्जाच्या तलाठी संजिवनी स्वामी यांनी शनिवार दि. 27 रोजी प्रत्येक्ष भेट देऊन पंचासमक्ष नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसिल कार्यालयाकडे सादर केला आहे.या पंचनाम्यात लाखोंचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आले. यावेळी रवि मगर, वैभव कोळी, राजेद्र मगर, किशोर केवडकर, उदीत कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
साडेतीन लाखाचा खर्च वाया
15 आक्टोबर रोजी अडीच एकर द्राक्षबागेची छाटणी केली छाटणी ते फळ धारणा ,मजुरी औषधे फवारणी . इत्यादी साठी साडे तीन लाखाचा खर्च केला . अवकाळी पावसाने तो खर्चही वाया गेला आहे घड कुजल्याने संपुर्ण बाग वाया गेली आहे.
विलास होळकर , शेतकरी ,सांगवी (काटी)