नळदुर्ग , दि . २९ : विलास येडगे
हजरत टिपु सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे टिपू सुल्तान जयंती कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
नळदुर्ग येथे हजरत टिपू सुल्तान यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरी केली जाते. सध्या महाराष्ट्रात सर्वच रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नळदुर्ग शहर टिपू सुल्तान कमिटीचे अध्यक्ष गौस कुरेशी यांनी याहीवर्षी टिपू सुल्तान जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले. दि.२८ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर घेण्याचे हे कमिटीचे सहावे वर्ष आहे.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलिस उपनिरीक्षक एम. एम. शहा, पत्रकार विलास येडगे, लतिफ शेख, आयुब शेख, हाफीज नियामतुल्ला इनामदार, खालेद इनामदार, सोलापुर नामाचे शोएब काझी, अजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,अश्विनी ब्लड बँकेचे बिराजदार आदीजन उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात पत्रकार आयुब शेख यांच्यासह तरुणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष गौस कुरेशी, उपाध्यक्ष मोहसिन शेख, सचिव वाजिद सौदागर, कोषाध्यक्ष वसिम कुरेशी व कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.