नळदुर्ग ,  दि . २३ एस के . गायकवाड 




नळदुर्ग - अक्कलकोट मार्गावरील  वागदरी ता.तुळजापूर पाटीजवळ   सोमवार  दि.२२  रोजी सयंकाळी ५ वाजण्याच्या  दरम्यान   झालेल्या पावसामुळे चिखल होवुन रस्ता खराब झाला.   या मार्गावरुन जाणारा ट्रक वागदरी पाटीनजीक शंकर बिराजदार यांच्या शेताजवळ पलटी होऊन रोडच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना घडली.

 गेल्या २-३  वर्षांपासून नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६५२ चे दुहेरी सिमेंट रस्ता कामाला सुरुवात झालेली असून ज्या शेतकऱ्यांची जमीन रोडमध्ये गेली आहे. त्यांनी सदर जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून शासनाकडे मागणी करून आपल्या न्यायीक मागणी करिता हायकोर्टात प्रकरण दाखल केले आहे. ज्याठिकाणी अडवणुक नाही .त्याठिकाणी रोडचे बांधकाम चालू आहे .रोडचे बांधकाम करण्यासाठी गुत्तेदारानी रोडवर खोदकाम करून ठेवले आहे. परंतु शेतकरी,शासन, न्यायालय आणि गुत्तेदार यांच्या चक्रव्यूहात हे काम अडकले असून नळदुर्ग ते वागदरी पाटी या रोडवर शंकर बिराजदार यांच्या शेताजवळ रोड बांधकामासाठी खड्डा खोदण्यात आला. परंतु शेतकऱ्यानी अडवणुक केल्याने गेल्या दोन -तीन वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. 

या ठिकाणी वाहनधारकाना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. दि.२२ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी ५  वाजता पडलेल्या आवकाळी पावसमुळे झालेल्या चिखलात ट्रक क्रमांक एमएच बीयू-१३६० हा घसरुन खड्ड्यात पडला 
 सुदैवाने कसलीही जीवीतहानी झाली नाही. हे जरी खरे असले तरी शासनाने शेतकरी व न्यायालय यांच्याशी योग्य तो समन्वय साधून यावर तोडगा काढून प्रलंबित असलेले रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. अशी मागणी जनतेतून होत आहे.
 
Top