वागदरी , दि .२० : एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी तेथे कोव्हिड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून वृध्द, अपंग व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून दि.२० नोव्हेंबर रोजी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले.
कोव्हिड-१९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू असून या मोहिमेला प्रतिसाद देत प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली वागदरी ता . तुळजापूर येथे आता पर्यंत सात टप्प्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आले असून दि.२०नोव्हेंबर २०२१ रोजी लसीकरणाच्या सातव्या टप्प्यात वागदरी येते वृध्द व अपंग व्यक्तींची गैरसोय होऊ नये, ते लसीकरणापासून वंचित राहु नये म्हणून आरोग्य सेविका एस.बी.गोरे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, ग्रा.प.सदस्य दत्तात्र सुरवसे, विद्या बिराजदार,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार ,संगणक परिचारक आनंद गायकवाड, आशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार,ग्रा.प.कर्मचारी सर्जेराव चव्हाण,आदींनी घरोघरी जावून लसीकरण मोहीम यशस्वी केली. गावात आता पर्यंत जवळपास ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.