काटी , दि . २६  : 

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील नालंदा बुद्ध विहारात व येथील जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे भारतीय राज्यघटनेच्या संविधान वर्धापनदिनानिमित्त जि.प.प्रशालेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम छबिले यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर येथील भिमनगरमधील बुध्दविहारात आंबेडकर प्रेमी भिमसैनिकांच्या वतीने शुक्रवार दि. (26 ) रोजी संविधान  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
   

 भारतीय राज्यघटनेच्या संविधान वर्धापनदिनानिमित्त येथील दलितमित्र नंदु बनसोडे यांच्यासह उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात येऊन येथील आंबेडकरप्रेमी महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीते सादर केली. 
त्यानंतर मिठाईचे वाटप करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी दलितमित्र नंदु बनसोडे, गौतम  बनसोडे आदींनी संविधानाच्या  प्रस्ताविकेचे वाचन करून  उपस्थितांना डॉ.  बाबासाहेब आंबेडकर व गौतम  बुध्द व संविधान  विषयी मार्गदर्शन केले.
            

 यावेळी नालंदा बुद्धविहारचे दलितमित्र नंदू बनसोडे, गौतम बनसोडे,माजी उपसरपंच अशोक बनसोडे, श्रावण वाघमारे, करण साबळे,ताई सुरते, अनुसया नंदु बनसोडे, रंजनाबाई शेरखाने, सोजरबाई बनसोडे यांच्यासह आंबेडकर  प्रेमी नागरिक, महिला उपस्थित होते. तर जि.प. प्रशालेत सहशिक्षक ज्योतिर्लिंग क्षिरसागर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम छबिले, बालाजी बंडगर, राजेश काकडे आदीजण उपस्थित होते.

 
Top