काटी , दि .२७

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शुक्रवार दि.( 26) रोजी येथील जिल्हा महीला काॅंग्रेस,पोलीस स्टेशन व सुयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.


तसेच 26/11 दहशतवादी हल्ल्याचे स्मरण करण्यात आले.या वेळी जिल्हा महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सिताराम साखर कारखान्याच्या डाॅ.राजलक्ष्मी गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना ग्रामीण भागातील महिलांना सतत मदतीचा हात देवुन त्यांना पुढे आणून  त्यांना संविधानाचे आधारे हक्काची जाणीव करुन दिली पाहीजे. तसेच ऊच्च शिक्षणासाठी प्रेरीत केले पाहीजे असे मत व्यक्त केले. यावेळी 
डि.वाय.एस.पी. सई भोरे-पाटील यांनी महीलांना व युवतींना मार्गदर्शन करताना संविधानाच्या आधारे युवतींनी प्रतीकुल परीस्थीतीवर मात करुन शिकले पाहीजे,खेळामध्ये पुढे आले पाहीजे.महीलांनी कुस्ती मध्ये नावलौकीक करावा तसेच स्पर्धा परीक्षा, ऊच्च शिक्षण घेवुन कुटुंब व समाजाला पुढे घेवुन जाण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.


पोलीस उपनिरीक्षक सचीन पंडीत यांनी उपस्थीत महीलांचे स्वागत केले. यावेळी कोरोना  वारीयर्स डाॅक्टर, डाॅ.श्वेता जाधव डाॅ.श्रोया कांगडे, डाॅ.प्राजक्ता शिनगारे,डाॅ.स्नेहा जाधव,डाॅ.दिव्या राजकुमार ईटुकडे(MBBS),कुमारी अनुजा कुंभार,कुमारी ऊमामा बेगडे, सेवाभावी शिक्षिका राधा गायकवाड, रमिजा गाडीवान, हॉस्पिटल कर्मचारी  फिजा तिलघर, रईसा शेख,अर्चना बंडगर,धनश्री बॅंकर ,श्रीमती.पौर्णीमा शिंदे, करिष्मा पटेल,वनिता धपाटे यांचा भोरे-पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,ट्राॅफी,व पुष्पगुच्छ देवुन यथोचीत सत्कार करण्यात आला.

       
 यावेळी सरपंच मंगल गवळी,संजना गुरव, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, डॉ. रविराज गायकवाड, पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक  बनसोडे,माळी, पोलीस कर्मचारी,युवा नेते हणुमंत गवळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top