काटी , दि .२७
तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संविधान दिनाचे औचित्य साधून शांतीदूत तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक निवा जैन, जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना तसेच तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील डी.वाय.एस.पी. भोर पाटील व तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शांतीदूत तरुण मंडळाचे कार्यकर्ते दत्ता उबाळे, सुरज मस्के, दत्ता मस्के, श्रीराम गायकवाड, राम उबाळे, समीर मस्के, योगीराज मस्के,किशन पांडागळे, लक्ष्मण मस्के आदी मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.