नळदुर्ग , दि . २७
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे विविध ठिकाणी संविधान दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरीत्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे, कमलबाई धुमाळ, महिला बचतगट सि.आर.पी.तथा ग्रा. प.सदस्या विद्या बिरादार, रोजगार सेवक रामसिंग परिहार, रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, ओंकार चव्हाण, सह ग्रामस्थ उपस्थित होते.
येथील पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर रोजी ७२ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजकुमार पवार,सामाजिक कार्यकर्ते आमोल पाटील,पत्रकार किशोर धुमाळ,माजी उपसरपंच बालाजी बिराजदार, ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे आदी होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन पंचशील बुद्ध विहार कमिटीचे सचिव एस.के गायकवाड यांनी केले.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून आभिवादन करण्यात आले.यावेळी जळकोट येथे आयोजित क्रिकेट तोरणामेंट स्पर्धेतील उपविजेत्या वागदरी क्रिकेट कल्बचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमोल पाटील व दत्ता सुरवसे आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच नागनाथ बनसोडे,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, बाळु पवार,जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र बिराजदार, युवा कार्यकर्ते विनोद पवार बुद्ध विहार कमिटीचे संदीपान वाघमारे,अनिल वाघमारे, सादु वाघमारे,वाल्मिक वाघमारे, भारत वाघमारे, अशोक गायकवाड, शिवाजी वाघमारे, क्रिकेट कल्बचे कर्नधार धम्मदीप बनसोडे, उपकर्नधार आप्पा भंडारे सह सर्व खेळाडू , महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.