तुळजापूर,दि.२७, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर  महाविद्यालयात तुळजापूर नगरीतील सर्व नगरसेवकांची नुकतीच बैठक संपन्न झाली. 


यावेळी तुळजापूर नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सभेस उद्देशून  म्हणाले की १९७१ साली तुळजाभवानी महाविद्यालयाची स्थापना झाली, स्थापना वर्षांपासून आजतागायत या महाविद्यालयाने अनेक शैक्षणिक स्थित्यंतरे पाहिले, येथील अनेक विद्यार्थी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या संस्कारमयी विचाराने प्रेरित होऊन स्वत:च्या पायावर उभा आहेत . आज मितिला शैक्षणिक क्षेत्रात खूप वेगळ्या प्रकारचे बदल घडत असुन बदलत्या प्रवाहानुसार आपण ही हे बदल स्विकारण्याची व नविन परिवर्तनानुसार विद्यार्थी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचा एक माजी विद्यार्थी म्हणुन सर्व योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम.मणेर म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी १९७१ साली या ज्ञान मंदिराची उभारणी केली.कित्येक विद्यार्थी या ज्ञान मंदिरात शिक्षण घेऊन आज यशस्वी झाले आहेत.हे महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्षामध्ये नॅक पुनर्मूल्यांकनांसाठी सामोरे जात असताना महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांची खुप महत्त्वाची भूमिका पूनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये असणार आहे, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम सर्वांना बरोबर घेऊन आयोजित करण्यात येणार असून तुळजापूर नगरीतील सर्वांनी सदर उपक्रमास आपले महाविद्यालय म्हणून सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

सदर बैठकीसाठी नगरसेवक अविनाश गंगणे, सचिन पाटील , विशाल रोचकरी, सुहास साळुंके, औंदुबर कदम,विजय कंदले यांची प्रमुख उपस्थिती लाभली,या बैठकीमध्ये प्रा.धनंजय लोंढे आणि प्रा.डॉ.एस.एम.देशमुख यांनी उपस्थितांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या आयोजनासंबधी माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रा.आशपाक आतार यांनी मानले.
 
Top